राष्ट्रवादीत काग्रेस (शरदचंद्र पवार)गटासाठी कर्तृत्ववान चेहरा मिळाला
पंढरपूर/प्रतिनीधी
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादीत काग्रेस(शरदचंद्र पवार) गटाकडे प्रवेश करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची धडपड सुरू आहे. अशातच आज शुक्रवारी पंढरपूरचे सुपुत्र वसंतराव देशमुख यांचीही अकलूज येथील शिवरत्न या ठिकाणी राष्ट्रवादीत काग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या जिल्हा अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीत काग्रेस (शरदचंद्र पवार)गटासाठी एक कर्तुत्वान चांगला चेहरा मिळाल्याचे दिसत आहे.
वसंतराव देशमुख यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे. अनेकांच्या अडचणीला धावून जाण्याचा त्यांचा एक अंगीकृत गुण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काग्रेस (शरदचंद्र पवार)गट वाढीसाठी एक चांगला नेता लाभला आहे. यामुळेच पक्षप्रमुख आणि प्रदेशाध्यक्ष व खा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रियाताई सुळे आमदार अभिजीत पाटील यांनीही फोनवरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती पत्र मिळताच वसंतराव देशमुख यांनी आपल्या समाजकार्याची दखल राष्ट्रवादीत काग्रेस पक्षाकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी आपण राष्ट्रवादीत काग्रेस पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त आपला वेळ घालविणार असून शरदचंद्र पवार यांच्या विचार आणि यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे सांगीतले.
चौकट
*गटबाजी नव्हे संघटन वाढविणार*: वसंतराव देशमुख
आपण सोलापूर ग्रामीण भागातून आलो आहोत. तरीही सर्वोत्तम पद आपल्याला देतं असताना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदार दिली आहे.ही केवळ शोभेचे भावले म्हणून पद मिळाले नाही. तर या सोलापूर जिल्ह्यात फिरत असताना राष्ट्रवादीत काग्रेस कशी वाढेल. यासाठी जास्तीचे प्रयत्न केले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत काग्रेस यापूर्वी पाहिले असता विविध पदाधिकारी यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र मला त्या गटातटाच्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळे संघटन वाढीला ब्रेक लागू शकतो. यासाठीच आपण गट तट न पाहता केवळ राष्ट्रवादीत काग्रेस पक्ष वाढीसाठीच आपला वेळ खर्ची घालवणार असल्याचे वसंतराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Tags
सामाजिक वार्ता