*मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस* चे नामांतर (नामकरण) *नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस* या नावाने लवकरात लवकर व्हावे

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय नरहरी!
मुंबई वृत्तान्त --
केवळ *नाना प्रेमी* म्हणूनच नव्हे, तर आपल्या आयुष्यात हिंदुत्वाला धक्का न लावू देता, समन्वय, सर्वसमावेशकता, सर्जनशील समायोजक जीवनदृष्टी, विकासदृष्टी आजीवन बाळगणारे स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात  *आशियायी रेल्वेचा पाया घालून दळणवळणाचे साधन* म्हणून रेल्वेची ओळख करून देणारे, *मुंबईचा सर्वांगीण विकास* करणारे, *मुरबाड* सारख्या ग्रामीण भागात वाढलेले, आणि पुढे मुंबईत *अजातशत्रू प्रथितयश व्यापारी, द्रष्टा विकासपुरुष* म्हणून नावलौकिक मिळविणारे, *ब्रिटिश इंडिया कंपनी सरकार आणि प्रशासना* वर आपल्या कार्यकर्तृत्वाचा *अमीट ठसा* उमटविणारे *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट* यांना न्याय मिळवून देण्यासाठी *भारतीय नागरिक* म्हणून, *सच्चा मराठी माणूस* म्हणून सर्वांनीच *मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस* चे नामांतर (नामकरण) *नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस* या नावाने लवकरात लवकर, राजकीय पक्षभेद, मतभेद, संस्थात्मक मतभेद, संघटनात्मक मतभेद, समूहात्मक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी सनदशीर मार्गाने या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी होऊयात.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form