पंढरपुरात जिल्हा साखर कामगार समन्वय समितीची बैठक संपन्न...

पंढरपूर प्रतिनिधी---
सोलापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती व पंढरपूर शहर व तालुका साखर कामगार संघटना यांच्या वतीने संघटनेच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी पंढरपूर येथे पार पडली.
यावेळी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी उपस्थित साखर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेच्या जोरावर साखर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडले. 
मात्र सध्या युनियन सक्षम नसल्याने कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळे पीएफ, पगारवाढ यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने साखर कामगारांवर अन्याय होत आहे. 
कामगारांनी एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे यासाठी प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शन करून कामगारांना न्याय मिळून देतील असा आशावाद व्यक्त करत संघटनेचे ध्येयधोरण सांगितले.
यावेळी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सेक्रेटरी शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, अशोक बिराजदार यांनी उपस्थित साखर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 
यावेळी साखर कामगार यांच्या वतीने संघटनेला धनादेश देण्यात आला. सदरची बैठक बंडू पवार, ऋषी वाघमोडे, आनंत जाधव, माऊली पवार, विजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form