कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मास कम्युनिकेशन अध्यासनातर्फे व्याख्यान
पंढरपूर प्रतिनिधी--
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मास कम्युनिकेशन विभागामार्फत समाज माध्यमे आणि सामाजिक जबाबदारी या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळी बिग डेटा, नोटिफिकेशन व अल्गोरिदमच्या साहाय्याने सोशल मीडिया मानवी जगण्यात हस्तक्षेप करत आहे. ट्रेंड व सजेशनवर तयार होणारी मते धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली माणसांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवली आहे, असे मत न्यू आर्ट्स सायन्स अहमदनगर कॉलेजचे जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. डॉ बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केले.पंढरपूर येथील मास कम्युनिकेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ' समाज माध्यमे आणि सामाजिक जबाबदारी
या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 'या उपक्रमांतर्गत व्याख्यान झाले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्र प्राचार्य बी.एस नाईकनवरे सर अध्यक्षस्थानी होते तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ बळवंत सर मास कम्युनिकेशन अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रशांत नलवडे रुसा समन्वयक प्रा. योगेश पाठक सर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन अनिकेत सुपले यांनी केले . तर या कार्यक्रमाचे आयोजन मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा.नितीन कांबळे यांनी केले यावेळी प्रा, तेजस चौगुले सर ,प्रा,संदीप बागल सर प्रा, रावसाहेब मोरे प्राध्यापक ,विजय जाधव प्रा. विकास गायकवाड सर प्राध्यापिका सविता जानकर व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता