बेंगलोर येथे होणार्‍या भारत प्रिंट एक्सोचा पंढरपूर येथे कार्यक्रम संपन्न....

पंढरपूर प्रतिनिधी-- 
 पंढरपूर येथे महाराष्ट्र मुद्रण परिषद व भारत प्रिंट एक्सो व पंढरपूर मुद्रक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित संपन्न झाला.बाळासाहेब आंबेकर (अध्यक्ष ममुप)यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नागेश शेंडगे (सरचिटणीस ममुप),संदीप कन्ना (चेअरमन मुद्रक सुची)  तुषार धोटे (प्रतिनिधी भारत प्रिंट एक्स्पो) यांची उपस्थिती होती. वरील मान्यवरांचा सत्कार पंढरपूर मुद्रक संस्थेच्या वतीने हार व पांडुरंगाची प्रतिमा देऊन केला.
     सदर प्रसंगी नागेश शेंडगे यांनी बेंगलोर च्या अधिवेशा बद्दल मार्गदर्शन केले. तर संदीप कन्ना यांनी पंढरपूरतील सर्वच मुद्रकांनी बेगलोर येथे यावे व प्रिटींग मशिनरी ची माहिती घ्यावी.असे सांगितले, तर तुषार धोटे बोलताना म्हणाले की आमच्या एक्सोची सुरूवात पांडुरंगाच्या नगरीतून सुरूवात झाल्यामुळे या प्रदर्शनास प्रचंड साथ मिळणार आहे. यावेळी बोलताना म्हणाले की कुठल्याही मुद्रकांनी आपण लहान मुद्रक आहोत अशी भावना ठेवू नये, या प्रदर्शनात आपण तेथे जाऊन काय करणार? असा विचार मनात आणु नका, लहान मोठे काही नसते त्यामुळे तुम्ही न लाजता येथील अधिवेशनाची माहिती घ्यावी. आज प्रिंटीग क्षेत्रात खुप बदल झाले आहेत. अगदी आपल्या ऑफीस मध्ये बसून आपण कस्टमरला सेवा देऊ शकतो. त्यामुळे कस्टमरचा ही वेळ वाचतो.व कामही ताबडतोब दिले जाते. त्यामुळे एकदा कस्टमर आला की त्याला चांगली सेवा द्या जेणेकरून तो कोठेही जाणार नाही.आणि तुम्ही सेवा नाही दिली तर तो अनेक ठिकाणी जाईल तुमचे कामही जाईल त्यामुळे वेळेत काम द्या,पैसे थोडे कमी जास्त मिळाले तरी चालतील पण कस्टमर सोडु नका. 
    तसेच बेंगलोरला पंढरपूरातील सर्व मुद्रकांनी यावे ह्या प्रदर्शनामुळे प्रिटींग व्यवसायात किती बदल झाला आहे हे कळेल. तुम्हीही त्यामार्गाने वाटचाल करून यशस्वी होणार यात शंका नाही असे आपल्या मार्गदर्शपर भाषणात सांगितले.  
    सदर कार्यक्रमास दत्ताजीराव पाटील(अध्यक्ष), बबन सुरवसे (उपाध्यक्ष), रामकृष्ण बीडकर (सचिव), श्रीराम रसाळ,मंदार केसकर, शिवम पाटील, गजानन कौलगी, श्रीरंग जाधव, सुरज कोठारी, शितल कोठारी, भास्कर रसाळ, सिध्देश्‍वर चव्हाण, संजय यादव, अमोल चव्हाण, सोमनाथ शिंदे, संतोष गोंजारी,नानासाहेब यादव, मकरंद वैद्य, आकाश साळुंखे, महेश साळुंखे, दत्ता आलाट या मुद्रकांची उपस्थिती होती. 
   या कार्यक्रमाचे प्रास्तावीक मंदार केसकर तर आभार प्रदर्शन रामकृष्ण बीडकर यांनी केले. त्यानंतर स्नेहभोजन झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form