रांझणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय रांझणी येथे विविध स्पर्धांचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी-- 
चंद्रभागा विद्याविकास मंडळ, चळे संचलित रांझणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय राझंणी येथे विविध स्पर्धाचे  नियोजन करण्यात आले. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. 

याप्रसंगी कोंढारकी येथील प्रतिक कन्स्ट्रक्शनचे संचालक पांडुरंग रामचंद्र काकडे यांनी रुपये दहा हजार किमतीच्या एक डझन खुर्जा प्रशालेस भेट दिल्या. तसेच कै.रावसाहेब आनंदा गायकवाड (रा. चळे) यांचे स्मरणार्थ प्रा. विनोद रावसाहेब गायकवाड यांनी रु. दहा हजार किमतीचे कायोमेट्रीक मशीन प्रशालेस भेट दिली. व सार्थक पेट्रोल पंपाचे प्रमुख श्री महादेव सि‌ध्देश्वर घाडगे यांनी १० वी व१२ वी विद्यार्थ्यांना पॅड देण्यात आले. यावेळी संस्थेच्या व प्रशाले
च्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

तसेच यावेळी  पांडुरंग विठ्ठठल दोडगे यांचा रांझणी येथे मः गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष शिंदे (माजी
मुख्याध्यापक - गोपाळपुर प्रशाला) हे होते. ई.१० वी च्या विद्यार्थिनीनी स्वागत गीताने उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात केली.

यानिमित्ताने  संस्थेचे अध्यक्ष हरिषदादा भास्करराव गायकवाड योनी प्रशालेय शालेय भेट वस्तू देणाऱ्या मान्यवरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील महाविदयालयाचे प्रा. भोसले  यांनी प्रास्ताविक केले. विविद्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रशालेतील सर्व र्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी प्रशालेल्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आली.
 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form