श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन सप्ताहाची सुरवात
पंढरपूर प्रतिनिधी--
श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज भक्त मंडळी यांना कळविण्यात अंत्यंत आनंद वाटतो की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज ७३९ वा समाधी दिन सोहळा सप्ताहाचे आयोजन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मूळ वास्तव्य स्थान, "विश्वकर्मा निवास" तानाजी चौक, पंढरपूर
येथे करण्यात आले आहे.तसेच श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
वै. ह. भ. प. दिगांबर शंकर महामुनी यांचे प्रेरणेने विद्यामान वंशजामार्फत मुळ वास्तव्य स्थानी (जन्मस्थानी)सालाबाद प्रमाणे यंदाही सातशे वर्षाची परंपरा असलेले श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७३९ वा समाधी सोहळा (पुण्यतिथी) उत्सव दि. १०/२/२०२५ ते दि. १६/२/२०२५ अखेर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त खालील विविध धार्मिक कार्यक्रम होतील.सकाळी ७ ते ८ नरहरी मुर्तीस अभिषेक, सकाळी ८ ते ९ विष्णु सहस्त्रनामपाठ, सकाळी ९ ते १० नाममंत्र जप, सकाळी ११ ते १२.३० नरहरी गाथ्यावरील भजन, दुपारी ४ ते ५ हरिपाठ, रात्रौ ७ ते ९ नामवंत व परंपरागत किर्तन सेवा होतील.
समाधी दिन बुधवार दि. १५/२/२०२५ रोजी दुपारी १२.०५ वा. समाधी व पादुकांवर पुष्पवर्षाव होईल. व रात्री नरहरी महाराज जीवन चरित्रावर सुश्राव्य किर्तन होईल. या दिवशीचे यजमानपद सौ. व श्री. सुनिल गजानन दिक्षीत (भंडीशेगांव) यांनी स्विकारले आहे.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी दिन सोहळा उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या सहभागी व्हावे तसेच सर्व कार्यक्रमास सुवर्णकार समाज बांधव, भक्तप्रेमी व संतानुयायी भाविकांनी अवश्य उपस्थित राहुन सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन ह.भ.प. चि.शंकर उर्फ ओंकार प्रमोद महामुनी यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता