केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी-- संभाजी शिंदे

पंढरपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध अमित शहांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करीत भाजपने देशाची माफी मागावी -संभाजी शिंदे 
पंढरपूर प्रतिनिधी--
संसदेत भारतीय संविधानावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. डॉ.आंबेडकरांचा अपमान म्हणजे देशातील कोट्यवधी वंचित, दलित, शोषितांचा अपमान आहे अशीच भावना व्यक्त होताना दिसून येत असून आज पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार नारे देत निषेध व्यक्त कऱण्यात आला. देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अवमान अमित शहांनी केला आहे.या देशातील शोषित वंचित समाज हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानतो आणि या अमित शहांनी त्यांचा अवमान देशाच्या संसदेत केला आहे.अमित शाहाना देशातील जनता त्यांची जागा दाखवून देईलच परंतु संसदेत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी व त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केली आहे.  

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बंडू घोडके,काकासाहेब बुराडे,अर्जुन भोसले,इंद्रजित गोरे,रणजित कदम,संजय घोडके,नागेश रितुण्ड,नामदेव चव्हाण,उत्तम कराळे,समाधान गोरे,दिलीप उघाडे,भारत कदम,संजय पवार,विजयबागल,
स्वप्नील गावडे,कल्याण कदम,अशपाक मुजावर,महेश कांबळे,आकाश माने,ऋषिकेश कवडे,जालिंदर शिंदे,सचिन मोरे,सचिन शिंदे,
संजय पवार,सतीश पाटील,स्वप्नील गावडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विविध पदाधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form