वाखरी येथे संत बाळूमामा भंडारा व भाकणूक कार्यक्रम संपन्न...


पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत येथिल बावन्न एकर येथे श्री.संत बाळूमामा मंदिर असून येथे तिर्थक्षेञ आप्पाचीवाडी कुर्ली व मेतके येथे भाकणूक सांगणारे भगवान महाजन ढोणे व सिद्धार्थ महाराज यांच्या भाकणूकीबरोबर महाभंडारा व तसेच नाथांचा दरबार या कार्यक्रमाचे आयोजन बावन्न एकर वाखरी येथिल बाळूमामा ठाणचे आप्पा महाराज व माने-कैकाडी स्नेह परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भगवान ढोणे महाराज व सिद्धार्थ महाराज यांच्या आगमनानंतर पालखी सोहळा मिरवणूकीस सुरूवात करण्यात आली हा पालखी सोहळा इसबावी-पंढरपूर येथिल श्री.विठ्ठल रूक्मिणी विसावा मंदिर येथे प्रदक्षिणा घेऊन नंतर बाळूमामा ठाण येथे आल्यानंतर दोन्ही महाराज मंडळी यांचा भाकणूक कार्यक्रम संपन्न झाला व आरती नंतर नाथांचा दरबार भंडारा महाप्रसाद झाला तसेच याठिकाणी आज सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून येथिल भक्तांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते तर रक्तदान केलेल्या सर्व भाविक भक्तांचे अक्षय ब्लड बँकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form