लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा ईव्हीएम समर्थनार्थ बहुमताने ठराव संमत -- सरपंच संजय साठे

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थणार्थ मतदानाबाबत ठराव बहुमताने पारित करून ईव्हीएम द्वारे मतदान घेण्याला समर्थन देऊन लक्ष वेधले आहेत.
नुकत्याच विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील नागरिकांनी ईव्हीएमला विरोध करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. ही मागणी फेटाळल्यानंतर या गावातून ईव्हीएम विरोधात ठिणगी पेटली होती. ईव्हीएमच्या विरोधात आणि समर्थनार्थ नेत्यांच्या सभा होत असल्याने मारकडवाडी हे गाव चांगलेच चर्चेत आले.  
-----**
 गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ईव्हीएमच्या मतदानाबाबतचा ठराव समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्यांसमोर मांडण्यात आला होता.
**-----
या ठरावाला १७ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत मांडलेल्या ठरावाला हात उंचावून सहमती दर्शवल्याने बहुमताने ठराव संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form