सांगोला प्रतिनिधी--
शिवा संघटना व सेवा जनशक्ती संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरजी धोंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशालीताई मनोहर जी धोंडे यांचे गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन , शिवैक्य झाल्या. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 50 होते.
मौजे शेवडी बा. ता. लोहा या धोंडे सरांच्या मूळ गावी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सौ वैशालीताई यांचा अंत्यविधी कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता शेवडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.
Tags
निधन वार्ता