पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान महासंकल्प शिबिर...

पंढरपूर :- प्रतिनिधी
पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात भव्य रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.आ.प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल ३४५ इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने परिचारक वाड्यावर कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीचा जनसागर उसळला. परिचारकांची लोकांप्रती असणारी श्रीमंती प्रणव परिचारक यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंग परिवार युवक आघाडी, प्रणव परिचारक युवा मंच आणि परिचारक गटाकडून रक्तदान संकल्प दिवस साजरा केला जातो. गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळ रक्तदानाचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने अनेक युवक करताना दिसतात. यंदाही परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिचारकांच्या वाड्यासमोरच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सकाळी आठ वाजल्यापासूनच रक्तदारासाठी मोठ्या संख्येने तरुण वर्गाने गर्दी केली होती. पंढरपूर शहर तालुक्यासह मंगळवेढा शहर तालुक्यातील तरुण देखील परिचारकांना शुभेच्छा देऊन रक्तदान करण्यासाठी दाखल झाले होते.
प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिचारक वाड्यावर अलोट गर्दी झालेली दिसून आली. मोठ्या संख्येने झालेल्या गर्दीमुळे परिचाराकांकडे असणारी लोकसंग्रहाची श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सकाळी आठ वाजले पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांचा मोठा राबता आणि रक्तदानासाठीची गर्दी परिचारक वाड्यावर होती. प्रणव परिचारक यांची ग्रंथतुला, साखर तुला आणि वस्त्र तुला अशा प्रकारच्या तुला करून सर्वसामान्यांना वाटप करण्याचा अनोखा उपक्रम मित्रमंडळी यांच्या वतीने करण्यात आला. शैक्षणिक साहित्यचे वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमातून आज पासून पुढील आठवडाभर परिचारक यांचा वाढदिवस साजरा होणार आहे.

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी अर्बन बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे यांच्या सह तालुक्यातील जेष्ठ नेते, पदाधिकारी, आझी माझी नगरसेवक यांच्या सह तरुण सहकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form