पंढरपूर प्रतिनिधी --
252- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील 357 मतदान केंद्रावर मतदान मोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडताना दिसत आहे.यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 68.97 टक्के इतके मतदान झाले होते.
प्राप्त माहितीनुसार 21व्या फेरीत 8696 इतके मताची आघाडी घेतली असून ते विजयी होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे, मनसेचे दिलीप बापू धोत्रे तर महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल सावंत या उमेदवारांची चौरंगी लढत होती.
आज मतदार संघातील सर्व भागात जनतेनी महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून उस्फुर्त प्रतिसाद देत मतदान हक्क बजावला आहे.
यावेळी महायुतीचे घटक पक्ष व पंढरपूर मंगळवेढा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांनी जल्लोष साजरा करत असताना दिसून येत आहे.
Tags
राजकीय वार्ता