प्रतिनिधी पंढरपूर --
पंढरपूर शहरातील गोरगरिबांच्या वसाहतीत अनेक समस्या असून या लोकांना जगणे अशक्य होत आहे.त्याच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे.तुम्ही केवळ मतदानरुपी आशीर्वाद मला द्या असे आवाहन काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले.
पंढरपूर शहरातील विविध भागात प्रचार दरम्यान काँगेस पक्ष्याच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक संजय बंदपट्टे,किरण घाडगे, ॲड राजेश भादुले,युवा नेते श्रीनिवास उपळकर,माजी उप नगराध्यक्ष सुधीर धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भालके म्हणाले, पंढरपूर शहरातील विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व पढील काळात मी आपल्या सोबत राहून सर्वत्तो मदत करणार तसेच आषाढी वारी काळात अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना प्रशासन जाणून बुजून त्रास दिला जातो या करेक्ट कार्यक्रम करणार.
यावेळी संजय बंदपट्टे, किरण घाडगे, श्रीनिवास उपळकर , ॲड राजेश भादुले यांनी मनोगत व्यक्त करून भालके यांना विजयी करण्यासाठीं आवाहन केले.
Tags
राजकीय वार्ता