पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर आणि इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, महाविकास आघाडीचे विविध नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच आजी माजी नगरसेवक, आदी मान्यंवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात भाजपमुळे प्रचंड असंतोष आहे. महागाई आहे,बेरोजगारी आहे, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे.मात्र भाजपने सर्व जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाची देखील भाजपने फसवणूक केली आहे.विश्वासघात केल्यानंतर,धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देतो.हा इतिहास असल्याचं मत व्यक्त करत भूषणसिंह
होळकर यांनी केले तसेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजयी होणार याची मला खात्री आहे.
यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले की इतर गावांपेक्षा कासेगावचा उत्साह अधिक आहे. देशमुखांच गाव म्हटल्यावर उत्साह असणे साहजिकच आहे. शेतकरी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे त्यामुळे सर्वच बाबतीत त्यांचं नियोजन कोलमडला आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल, सगळ्या जाती धर्मांना न्याय द्यायचा असेल तर शरद पवार यांच्या विचाराचे सरकार महाराष्ट्रात आणावं लागेल. यासाठी तुम्ही येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरील बटन दाबून मतरुपी आशीर्वाद देवुन अनिल सावंत यांना मोठ्या मताधिक्यने विजयी करावे अशी निनंती उपस्थित मतदार बंधू भगिनींना केली.
Tags
राजकीय वार्ता