मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मा विनोद पाटील यांचा भगिरथ भालके यांना पाठिंबा...
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकी शहरात प्रचार दरम्यान शहरातील इसबावी मलपे चौक येथे भगीरथ दादा भालके यांची कॉर्नर सभा संपन्न झाली,यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मा विनोद पाटील (छत्रपती संभाजी नगर) यांनी महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ दादा यांना जाहीर पाठींबा दिला.
या वेळी इसबावी भागातील जेष्ठ नागरीक महिला व तरुण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.तसेचभगिरथ भारत भालके डॉ.प्रणिता भगिरथ भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भगिरथ भालके यांच्या प्रचाराची धुरा सर्व सामान्य जनतेने हातात घेऊन शहरात विविध भागात प्रचार करीत असल्याचे दिसून येते आहे.पंढरपर शहरातील विविध समस्या व स्थानिक पातळीवर प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच त्यावरील उपाय योजना करण्यासाठी भगिरथ भालके यांना विजयी करण्याचे आवश्यक आहे असे आवाहन सर्व सामान्य स्तरातून केली जात आहे.याप्रचार फेरीत महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे कार्यकर्ते, नेते,पदाधिकारी, महिला, युवा युवती, जेष्ठ नागरिक यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
Tags
राजकीय वार्ता