भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी खा.प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील विविध गावास भेट
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे काॅग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील विविध गावास भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधताना त्यांनी आवाहन केले की, लोकसभेप्रमाणे शांतीत क्रांती करायची आहे आणि भगिरथ भालके यांना मंत्री म्हणून पाठवायचे आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी अनेक कठीण परिस्थितीचा सामना करत स्वतःहाचे दुःख बाजुला ठेवून जनतेसाठी झगडणारा नेता असुन मला विश्वास आहे की आपण जन आशिर्वाद देऊन त्यांना मोठ्या मताधिक्यने विजयी कराल, शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा युवती यांच्या विश्वासापात्र उमेदवार भगिरथ भालके यांच्या पाठीशी जनतेनी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.ज्याप्रमाणे सोलापूर लोकसभा निवडणुकीत आपण शांतीत क्रांती घडवून मला मोठ्या मताधिक्यने विजयी केले त्याच प्रमाणे यावेळी तसेच करायचे आहे.भरभरुन मतदान रुपी आशिर्वाद देऊन भगिरथ भालके यांना निवडणूक आणायचे आहे,आणि मंत्री म्हणून पाठवायचे आहे.
याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारासाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी निंबोणी,चिक्कलगी,
शिरनांदगी मारोळी, महदाबाद (हु),
पडोळकरवाडी,लोणार या गावामध्ये भेट दिली, यावेळी मोठ्या संख्येने भालके प्रेमी जनता, महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता