डॉ.प्रणिता भालके यांनी पती भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी मैदानात...

पंढरपूर शहरात विविध सामाजिक संस्था व राजकीय नेते मंडळी यांच्या गाठीभेटी घेत सक्रिय सहभाग... 

पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे त्यांच्या पत्नी डॉ प्रणिता भालके यांनी सक्रीय सहभाग घेतला असून महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेट घेतली व आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार कॉग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी मी घटक पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते यांच्याशी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली आहे.तसेच पंढरपूर शहरातील विविध भागात जनतेशी संवाद साधताना त्यांनी भगिरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच पंढरपूर येथील राऊळबाबा प्रतिष्ठान, भक्ती शक्ती चौक मित्र परिवार,झेंडे गल्ली, भुयाचा मारुती परिसर, अनिल नगर,खडे गल्ली,काशी कापडी गल्ली,आदी भागातील  शेकडो कार्यकर्त्यांचा, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व महिलांचा डॉ. प्रणिता भालके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ  भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form