महायुती सरकारच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वच क्षेत्रांत विकासकामे झाली
पंढरपूर प्रतिनिधी --
महायुती सरकारच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वच क्षेत्रांत विकासकामे झाली आहेत असे भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विराट जनसभेस संबोधित करताना नामदार नितीन गडकरी यांनी सांगितले.
याप्रचार सभेचे आयोजन आठवडा बाजार, शिवप्रेमी चौक, मंगळवेढा येथे करण्यात आले होते. यावेळी मा. आ. प्रशांतजी परिचारक यांच्या उपस्थितीत ना.नितीन गडकरी आपल्या खास शैलीत विराट सभेत जनतेशी संवाद साधला,पुढे बोलताना ते म्हणाले की,ही निवडणूक उमेदवारांचं भविष्य ठरवणारी नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी आहे,महायुती सरकारच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वच क्षेत्रांत विकासकामे झालीआहेत.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्याचे काम होत आहे. या मतदारसंघातील जनता विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा समाधान महादेव आवताडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास यावेळी मा. ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन महायुतीच्या मागे सक्षमपणे उभं राहिलं तरच आपल्याला अजून मोठ्या विकासाचा पल्ला गाठता येईल.आपल्या गावाचा,तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास हाच प्रामाणिक ध्यास समोर ठेऊन संपूर्ण मतदारसंघातील जनतेने महायुतीसोबत उभे राहून हा विकासाचा प्रवास अधिक मजबूत केला पाहिजे,असे विचार व विनम्र आवाहन करून समाधान आवताडे यांनी प्रचंड जनसमुदाया
सोबत संवाद साधला.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर दादा कसगावडे, मंगळवेढा भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, माजी नगरसेवक अजित आप्पा जगताप, माजी सभापती सुधाकर मासाळ,शिवसेना जिल्हाप्रमुख महेशनाना साठे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण,संतोष पवार,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माऊली
हाळणवर,भाजपा विधानसभा संयोजक तानाजी काकडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, नागेश डोंगरे, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, शिवसेना तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ.प्राजक्ता बेणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीकांत शिंदे, प्रकाश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य बापुराया सावकार चौगुले, माजी उपसभापती विजयसिंह दादा देशमुख, माजी संचालक द्रोणाचार्य हाके, माजी नगरसेवक सुनिल डोंबे,सौ वर्षाताई शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, जेष्ठ नेते लतीफभाई तांबोळी, आप्पासाहेब पट्टणशेट्टी, सुर्यकांत ठेंगील, मुज्जमिल काझी, सुरेश जोशी, दत्तात्रय जमदाडे, औंदुंबर वाडदेकर, ज्ञानेश्वर भगरे आदी मान्यवरांसह भाजप महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, विविध गावातील सरपंच पदाधिकारी व मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
Tags
राजकीय वार्ता