दिल्ली येथे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना "भारत श्री" पुरस्कार ने सन्मानित...

पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर शहरातील मुस्लिम युवक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना दिल्ली येथे राष्ट्रीय भारत श्री पुरस्कार ने सन्मानित केले तसेच पुर्ण भारतातून फक्त 15 जणांना मिळाला आहे. दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया मध्ये हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.सदर पुरस्कार बार कौन्सिल दिल्ली चे अध्यक्ष R S गोस्वामी जी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी मा.मंत्री,मेंबर ऑफ राज्य सभा किर्तीकया शर्मा,चेअरमन नॅशनल trader welfare board भारत सरकार श्री सुनील सिन्गी जी,चेअरमन नॅशनल minority commission भारत सरकार श्री इक्बाल लालपुरा,सदस्य भारत सरकार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग धन्यकुमार गुंडे जी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

मुजम्मील कमलीवाले हे पंढरपूर शहरातील आदर्श व्यक्तिमत आहे. अनेक गरीब लोकांना रोजी रोटीचीही भ्रांत होती.अशा गरीब लोकांचा शोध घेऊन त्यांना अन्नदान करण्याचे काम त्यांनी केले होते.समाजातील गरीब जगत असलेल्या शैक्षणिक सोयी सुविधा नसलेल्या मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले आहेत.
समाजातील उपेक्षितातील उपेक्षित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.यापुढेही अधीक जोमाने काम करणार समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी अशी प्रतिक्रिया दिली हा पुरस्कार माझा नसुन, पुर्ण समाजाचा आणी माझ्यासारखे समाजासाठी काम करणार्या लोकांचा आहे.त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले मुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form