मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी खर्डी येथुन केला प्रचाराचा शुभारंभ...

 
पंढरपूर प्रतिनिधी--
राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी खर्डी येथुन केला प्रचाराचा शुभारंभ.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून दिलीप बापू धोत्रे यांना मतदारसंघातील विविध भागातील मनसे, पदाधिकारी, कार्यकर्ते , मित्र परिवार हितचिंतकांनी या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मनसेचा उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
याचाच एक भाग म्हणून आज नवरात्र उत्सव व घटस्थापना या शुभ मुहूर्तावर मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे श्रध्दास्थान संत सिताराम महाराज यांच्या खर्डी येथिल मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ अर्पण करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी महिला, युवा,युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी खर्डी येथुन प्रचार शुभारंभ सभेच बोलताना ते म्हणाले की,मी दगड फोड्याचा मुलगा आहे प्रस्तापितांची सत्तेचा माज उतरल्या शिवाय रहाणार नाही.आज सभेत त्यांनी सत्ताधारी पक्षाचे  वाभाडे काढले. महिला व युवकांसाठी मनसे तर्फे विविध माध्यमांतून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजातील सर्व सामान्य महिला वर्ग  यांना स्वबळावर उद्योग, व्यवसायसाठी मनसे तर्फे विशेष सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले.तसेच शेतकरी,कष्टकरी,तरुण बेरोजगारांच्या समस्या कायमची संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे असे त्यांनी सांगितले आहे.

खर्डी येथील प्रचारसभेस प्रमुख उपस्थित नाना कदम,वकील यासीन शेख ,शशीकांत घाडगे,संतोष कवडे, संतोष रणवरे,अमर कुलकर्णी, अनिल केदार,राजु बाबर,गणेश पिंपळणेकर,नागेश इंगोले, दत्तात्रय वलेकर, बाबा चव्हाण, प्रशांत बंडगर, औदुंबर शेळके तसेच मनसेचे असंख्य कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
     

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form