पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिक्षक, शिक्षकेतर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न...

पंढरपूर  प्रतिनिधी-- 
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरीय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांचा यथोच्ति सन्मान पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. 
यावेळी व्यासपीठावर मनसे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते याप्रसंगी मनसे नेते तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे बोलताना म्हणाले की शिक्षक शिक्षिका या बंधू-भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाण उपस्थित होते या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आली होती तीचे याप्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले.   
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. आपल्या कोणत्याही अडीअडचणी समस्या त्या सांगा आम्ही त्या अडचणीचे,
समस्येचे निरसन केल्याशिवाय राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही,असे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पुरस्कार सोहळ्यामध्ये व्यक्त केले.

यावेळी मनसे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय चित्रे,मनसे नेते राजा चौगुले, मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे शहर मनसे महिला अध्यक्ष वनिता वागस्कर,मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके,मनसे लोकसभेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात आला.याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शिक्षक, शिक्षकेतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form