कल्याणराव काळे यांचा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार...

पंढरपूर प्रतिनिधी दि.05- 
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे हे  पंढरपूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास भेट देवून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या..,.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश उपाध्यक्ष, समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत आबा, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, कार्यकारणी सदस्य नारायण शिंदे,अर्जुन जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड,  यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजीबापू साळूंखे, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, राजुबापू पाटील, सिताराम महाराज साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे यांचे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          यावेळी मंत्री आदीतीताई तटकरे यांनी कार्यकर्त्यांचा आढावा घेवून तालुक्याच्या विकासावर चर्चा केली  त्यांच्या व्यस्त कामातून संपर्क कार्यालयास भेट दिल्याबददल प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form