प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च कासेगाव या औषध निर्माण शास्त्र शाखेच्या पदवी व पदविकाच्या प्रत्येकी ६० जागांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता
पंढरपूर प्रतिनिधी--
वसंतनाना देशमुख बहुउद्देशीय समाजसेवा संस्था, कासेगाव संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च कासेगाव या औषध निर्माण शास्त्र शाखेच्या पदवी व पदविकाच्या प्रत्येकी ६० जागांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाल्याची माहिती सौ. राही संग्राम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविद्यालयामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाची सोय होणार आहे.कासेगाव पंचक्रोशीत तंत्रशिक्षणाची कोणतीही सोय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खास करून मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक वसंतनाना देशमुख यांनी केले आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता