उद्योजक राजाभाऊ खरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पंढरपूर प्रतिनिधी--
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे नेते राजाभाऊ खरे यांनी नुकतीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली राजाभाऊ खरे हे मोहोळ विधानसभा मतदार संघातून विधानसभा लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांनी आता पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. 
उद्योजक असणाऱ्या राजाभाऊ खरे यांनी पंढरपूर भागातील १७ गावांसह मोहोळ तालुका व उत्तर सोलापूरमधील जोडलेल्या गावांमध्ये गेल्या काही वर्षात काम उभा केले आहे. ते २०२४ ची विधानसभा लढणार आहेत. मोहोळ मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. या पक्षाचे येथे विद्यमान आमदार असल्याने साहजिकच येत्या निवडणुकीत मोहोळ अजितदादांच्या पक्षाकडे जाणार हे निश्चित आहे. यामुळे राजाभाऊ खरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली व मतदारसंघात केलेल्या कार्याचा अहवाल त्यांना दिला.

राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदारसंघात पाण्याचे मोफत टँकर्स पुरविणे, रस्ते तयार करून देणे यासह विविध योजना राबविल्या आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मोहोळ मतदारसंघात चर्चेला ऊत आला आहे. चार दिवसांपूर्वीच खरे यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना, आपण शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form