"माइंड गुरु फाउंडेशन" जालना कडून सामाजिक उपक्रम...

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या
इतकेच महत्त्वाचे -- किशोर आघाम

पुणे प्रतिनिधी --
"माइंड गुरु फाउंडेशन" ही मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी विशेष समाजकार्य करणारी संस्था आहे. या फाउंडेशनकडून मानसिक आरोग्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.यामध्ये काउंसलिंग, मनोविश्लेषण, आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध मार्गदर्शनपर सत्रे घेतली जात आहेत.

सध्या मानसिक तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक समस्यांमुळे समाजात अनेकजण प्रभावित होत आहेत. "माइंड गुरु फाउंडेशन" या समस्यांवर उपाय म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक सत्रांद्वारे लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करते.फाउंडेशनचे संस्थापक आणि मानसोपचारतज्ञ  किशोर आघाम सांगतात की, "मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या
इतकेच महत्त्वाचे आहे, आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव असणे आवश्यक आहे.पढे बोलताना ते म्हणाले की,आगामी काळात फाउंडेशन  शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागात मानसिक आरोग्य शिबीर घेणार आहे.

तसेच माईंड गुरू फाउंडेशन च्या स्वयंसेवी समुपदेशिका आणि पेरेंन्टींग कोच आरती रवि महामुनी,पुणे या मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी आनंदी पालकत्व, मुलांमध्ये मूल्य शिक्षणाची गरज अशा विषयावर वेबिनार घेत आहेत तर सध्याच्या अतिशय गंभीर आणि सेन्सिटिव्ह टॉपिक " गुड टच बॅड टच आणि चाइल्ड सेफ्टी " या विषयावर  त्यांचे वेबिनार झाले आहे.

"माइंड गुरु फाउंडेशन" तर्फे मुलांच्या संरक्षणासाठी "गुड टच - बॅड टच" या विषयावर विशेष वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारचा उद्देश मुलांना सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती देणे आणि पालकांना त्याबाबत मार्गदर्शन करणे होता.व"मुलांना लहान वयातच चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाणीव करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडणार नाहीत."

मुलांच्या शारीरिक सुरक्षिततेचा आणि त्यांना कळत नकळत होणाऱ्या अनुचित स्पर्शाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची देवाणघेवाण या वेबिनारमध्ये करण्यात आली आहे.उपयुक्त टिप्स आणि यासंबंधित कायदेशीर माहिती यावर या वेबिनार मध्ये माहिती देण्यात आली.
 लैंगिक शिक्षण मुलांना कोणत्या वयात आणि कसे द्यावे.त्यांच्याशी या विषयावर कसे बोलावे, हे आरती महामुनी यांनी अतिशय मुद्देसूद सांगितले.याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form