मोहोळ मतदार संघात आजवर विविध विभागातून कोठ्यावधीचा निधी मिळवण्यासाठी खरे यांना यश

राजू खरे यांच्या प्रयत्नातून आणखी एक कोटी मंजूर... ग्रामविकास विभागाचा एकूण  चार कोटीचा निधी...
पंढरपूर प्रतिनिधी-- 
मोहोळ विधानसभा मतदार  संघांचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदार संघातील कोठ्यावधी रुपयाची विविध विकास कामे खेचून आणली आहेत. अशातच मागील दोनच दिवसापूर्वी आणखी नव्याने एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, आमदार  भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी आपल्या विभागातून 25:15  या योजनेतून आणखी एक कोटी रुपयाचा निधी विविध गावातील विकास कामाकरिता मंजूर करण्यात आला आहे.

    यापूर्वीही ग्रामविकास विभागातून तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.असे एकूण चार कोटीचा निधी मिळाला आहे. यामुळे मोहोळ मतदार संघांचे उमेदवार राजू खरे यांनी आभार व्यक्त केले आहे.
    या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या एक कोटी निधीतून   पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील बाळूमामा मंदिरचे पत्राशेड साठी 20लाख , आंबे येथील खंडोबा मंदिरासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी 20लाख, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील  हिंदू स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील रोकडोबा पालखी मंदिर व मारुती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसाविणेसाठी 10 लाख, मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे  गावातील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपये, मोहोळ तालुक्यातील जामगांव बु.गावातील दलित वस्तीमधील स्मशानभूमी  वॉल कंपाऊंड शेड व फीवर ब्लॉक बसवण्यासाठी 10लाख रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील सोमसिद्ध मंदिरातील फरशी बसवणे व सुशोभीकरण करणे या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.असा नव्याने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा समावेश असून यापूर्वीची विविध विकास कामेही सुरू करण्यात आली असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण होणार आहेत. अशी माहिती राजू खरे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form