चळे येथे राजू खरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

चळे 80 लाख, नेपतगाव 30 लाख, तर आंबे येथील 35 लाख रुपये निधीच्या कामाला झाली सुरुवात
पंढरपूर प्रतिनिधी--
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या मागणीनुसार मतदार संघामध्ये शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शासनाचा निधी आला नाही. त्याच कामासाठी स्वनिधीचा वापर करीत विकास कामे सुरु करण्यात आली आहेत. या विकास कामांचा शुभारंभ उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते रविवारी पार पडला.

उद्योजक राजू खरे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मतदार संघातील विविध गावांमध्ये मंजूर करून आणला आहे .यापैकी पंढरपूर तालुक्यातील चळे येथे विविध विकास कामाच्या 80 लाख रुपये, नेपतगाव येथील 30 लाख रुपये, आंबे येथील 35 लाख रुपये या वरील तीनही गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ खरे यांच्या हस्ते पार पडला.

या सुरु करण्यात आलेल्या विकास कामामध्ये चळे येथे शेरी वस्ती पर्यंतच्या खडीकरण रस्त्यासाठी 48 लाख, दलित वस्ती सुभेदार चौक ते समाज मंदिर 10लाख, चळे येतील बरड वस्ती मधील श्री संत बाळूमामा मंदिरासाठी स्वनिधीतून दुसऱ्या मजल्याचे कामासही सुरुवात करण्यात आली. दलित वस्ती येथील सुभेदार चौक या ठिकाणी इमारतीसाठी 10लाख, प्रक्षाळे वस्ती ते आंबे सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यासाठी 6लाख, जाल्याळ वस्ती पासून आणि रांजणी रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी 6लाख रुपये नेपतगाव येथील समतानगर मधील समाज मंदिरासाठी 10लाख रुपये, येथील स्मशान भूमी रस्ता, सरक्षक भिंत आणि शुशोभीकरण याकरिता 20 लाख रुपये ,आंबे येथील खंडोबा मंदिराच्या परिसरातील सरक्षक भिंत याकरिता 20 लाख,तर स्वनिधीतून बोरवेल,संत सावता महाराज मंदिरासाठी रंगरंगोटी आणि
चंद्रभागा शेड ते कॅनॉल पट्टी व घोडके वस्ती रस्ता यासाठी स्वनिधी वापरण्यात येणार असून या विविध कामाचा शुभारंभ उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते पार पडला आहे.
वरील विकास कामांचे शुभारंभ प्रसंगी चळे येथील विठ्ठल चे माजी संचालक संतोष गायकवाड, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, ग्रा. प. सदस्य अतुल मोरे, रणजीत सोनटक्के, बालाजी वाघमारे, सुशील वाघमारे, गोरख गायकवाड, मंगेश गायकवाड, अजय वाघमोडे, सुधाकर मोरे, दरलींग फडतरे, अमोल वाघमारे, धनाजी माने, लखन वाघमारे, रुपेश वाघ, श्रीकांत पंडित, अण्णासाहेब खिलारे, विजय वाघमारे.
नेपतगाव येथील सरपंच आशाबाई पांडुरंग परकाळे, भास्कर हेगडकर, माजी सरपंच बाळासाहेब बुधनेर, तानाजी येडगे, अशोक कदम, ज्ञानेश्वर लवटे, महेंद्र क्षीरसागर, पोलीस पाटील कुबेर पाटील, ग्रा. प सदस्य ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कदम, प्रभाकर क्षीरसागर, अभिजीत पालवे, सोसायटीचे चेअरमन आनंद वाघ, व्हाईस चेअरमन वसंत परकाळे, ज्ञानेश्वर कदम, दामोदर वगरे,श्रीमंत घोडके, नोमिनाथ क्षीरसागर , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल हेगडकर, अंकुशराव येडगे, अजित कदम,राजाराम हेगडकर, दाजी क्षीरसागर, आबासाहेब कदम,माजी सरपंच पांडुरंग परकाळे यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आंबे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम सावंत, विठ्ठल क्रेडिट चे चेअरमन दिलीप कोळी, सरपंच सुशील सावंत, उपसरपंच निशाल शिंदे, वाल्मिकी संघाचे माऊली कोळी, ग्रामपंचायत सदस्य जयवंत अंकुशराव, अरुण शिंदे, गणेश कांबळे, महादेव शिंदे, काँग्रेसचे नेते नितीन शिंदे, लक्ष्मण गायकवाड, हरी गायकवाड, संभाजी धनवले,माजी सरपंच प्रकाश माळी, भिवाजी माळी, रामहिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे, नजीक पिंपरीचे सरपंच सुनील पाटील, माळवाडी चे सरपंच लिंगराज व्हणमाने, जामगाव चे उपसरपंच काशिनाथ हाके, पुळुजवाडी चे सरपंच नानासाहेब व्हनमाने, पापरी चे सरपंच सौदागर खडके, सेवालाल नगरचे सरपंच मेजर लक्ष्मण राठोड, गोपाळपूर चे सरपंच अरुण बनसोडे, पांडुरंग बचुटे, यांचेसह राजू खरे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form