श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यार्थी दत्तक पालक योजना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न...

पंढरपूर प्रतिनिधी--
 श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान मार्फत एस. एस फिलोशीप, स्व. हुकमीचंद चोरडिया शिष्यवृत्ती व विद्यार्थी दत्तक पालक योजना पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य. डॉक्टर उमाकांत चनशेट्टी यांनी केले. स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जितेंद्र खंडागळे यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. संस्थेचे कार्यवाह जितेंद्र तुकाराम खंडागळे यांनी प्रास्ताविक सादर  केले. सदर  प्रास्तविकमधे  त्यांनी एस. एस. फिलोशीप व चोरडिया शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात फिलोशीप प्राप्त धारक विद्यार्थ्यांनी यू.पी.एस.सी,आय. ए .एस. होऊन मोठी स्वप्ने बाळगावीत व  आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावीत असे त्यांनी सांगितले. 
प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते फिलोशीप प्राप्तधारक विद्यार्थी यांना अनुक्रमे- 2000/-3000/- व 5000/- रुपये धनादेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना दत्ता जाधव, संपदा पिंपळनेरकर व  सतीश सपताळ गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त करून संस्थेचे अभिनंदन केले. 

त्यानंतर विद्यार्थी दत्तक पालक योजनेचे शैक्षणिक साहित्य प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. प्राचार्य प्रशांत पाटील सर उपस्थित होते. तसेच  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

या कार्यक्रमासाठी एस. एस. फिलोशीप प्रमुख  किशोर पिसे व चोरडिया शिष्यवृत्ती प्रमुख  सिद्धेश्वर धोकटे  यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड  व आभार प्रदर्शन विलास लेंडवे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form