महिलांनी झाडांच्या फुलाप्रमाणे जिवन जगावं व इतरांनाही आनंद द्यावा.... सुनेत्राताई पवार

महाशक्ती ग्रुप प्रथम आयोजित उपक्रम...............
=======================
पंढरपूर.... पावसाच्या रिमझिम सरी, हिरवागार निसर्ग, विविध सण या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भरलेले असते.
अशा दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेलेल्या उत्साहाची जोड मिळते ती मंगळागौर कार्यक्रमामुळे.....
रुक्मिणी विद्यापीठाने पंढरीत आयोजित केलेल्या मंगळागौर खेळांमध्ये विशेष सहभाग जाणवला तो म्हणजे तरुणीपासुन ते साठी उलटलेल्या स्त्रियांचा आणि तोही सारख्याच उत्साहात .....
मंगळागौरीचे खेळ त्यातील गाणी काव्य व विविध स्पर्धा व विविध खेळामुळे पंढरीत मराठी संस्कृतीचा ठेवाच रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापक सचिवा सौ.सुनेत्राताई पवार यांनी जपला आहे. 
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते कलश पूजन करून करण्यात आली.
 या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ. सुनेत्राताई पवार म्हणाल्या की भारतीय संस्कृतीचे जतन होण्याचे दृष्टीने व महिला तानविरहित राहावे, तरआधुनिक काळातही या खेळांचे स्थान टिकून राहावं या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून तर ज्येष्ठ पिढी आणि युवा पिढी यांचा समन्वय साधण्याचा आमचा हा प्रयत्न असून आपली संस्कृती जोपासण्याचे काम महिला वर्गाणी करण्याचे आवाहन केले. महिलांनी झाडांप्रमाणे असावे झाड कधीही विचार करत नाही मी किती फुले गमविली झाड नविन फुले तयार करते तसे महिलांनीही आपल्या जवळचे ज्ञान, संस्कार इतरांना देणेचे सांगुन संस्था सन 1994 पासून अशा विविध कार्यक्रमातून महिला सबलीकरणाचे काम करत असल्याचे सांगितले..,..  
यावेळी रु.200000/00संस्था देणगीदार डॉ.वनिता घाडगे देसाई यांचा माहेरची साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
तुझं माझं व्यासपीठ या मंगळागौरीच्या खेळात सहभागी झालेली प्रत्येक महिला पारंपारिक वेशात तर होतीच शिवाय कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या महिलाही पारंपारिक वेषात नऊवारीत आलेल्या होत्या. कार्यक्रमाच्या संयोजिका सौ.सुप्रिया पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रेक्षक महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.
मंगळागौर स्पर्धेचे रु. दहा हजार चे प्रथम पारितोषिक महाशक्ती ग्रुपने व रु.सात हजार चे  द्वितीय पारितोषिक नवशक्ती ग्रुपने पटकाविले तर आकर्षक बक्षिसांचे मानकरी स्मार्ट सासूबाईचे वर्षा ढाळे व नथ विषयी चारोळीचे प्रीती कांबळे यांनी विशेष बक्षीस मिळविले.
अशा या खेळांतून ऐतिहासिक आणि वर्तमान असे दोन्ही काळ अनुभवण्याची पर्वणी उपस्थित महिलांना या खेळातून मिळाली.
 तर डॉ. वनिता घाडगे देसाई दूरदर्शन निवेदिता यांच्या सूत्रसंचालनाने महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मंगळागौर स्पर्धेचे परीक्षक म्हणून ब्रह्मदेव मोरे व ॲड. राजेश्वरी केदार यांनी निपक्षपणे केले.
 कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून चंद्रकला सावंत.वसुधा कुंभार, डॉ.तेजु भायगुडे,प्रा.शितल कवडेडॉ.पुजा ननवरे, आशा जमदाडे,टाक भाभी, श्रध्दा देशमुख, शुभांगी कोल्हे,मंजुषा शिंदे,यांची विशेष उपस्थिती लाभली. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभावरी डुबल, सविता लोखंडे, राणी लाडे वैशाली कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form