श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदाच्या वर्षीपण गोकुळाष्टमी,श्रीकृष्ण जयंती,जन्माष्टमी पंढरीत चौफाळ येथिल श्रीकृष्ण मंदिरात सोहळयाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवारी पहाटे 5 वाजता श्री ची पुजा, अभिषेक असणार आहे तसेच महानैवेद्य अर्पण करून दर्शनास येणार्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता महिला भजनी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम असून रात्री 11 वाजता वारकरी भाविक भक्तांनाचे भजन व रात्री बारा वाजता गुलालाची उधळण करुन व दहीहंडी फोडली जाणार आहे.श्री कृष्ण जन्म सोहळा निमित्ताने मंदिरास सुंदर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.अशी माहिती सागर बडवे व पियुष बडवे यांनी दिली आहे
Tags
धार्मिक वार्ता