पंढरपूर हा युती मध्ये परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ राहिला आहे
पंढरपूर प्रतिनिधी-- (निवडणूक विशेष)
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आता भाजपासोबत शिवसेनेने देखील उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. पंढरपूर हा युती मध्ये परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ राहिला आहे. त्यामुळे या मतदार संघात आगामी निवडणुका सेनेने लढववी. अशी शिवसैनिकांची मागणी आहे. असे जर झाले तर सध्या सेनेकडून निवडणूक लढवण्यास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचा चेहरा पुढे येऊ शकतो.
अनिल सावंत यांनी मंगळवेढा जवळ असणाऱ्या लवंगी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून मोठा राजकीय गोतावला जमा केला आहे. सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सर्वच स्तरावरील नेते , व्यक्ती यांच्याशी त्यांचा चांगला ऋणानुबंध आहे. अशा स्थितीत अनिल सावंत हे शिवसेनेकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमदारकीचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात. शिवसेनेकडून यापूर्वी दिवंगत नेते आमदार भारत भालके , विद्यमान आमदार समाधान आवताडे , येताला भगत यांनी निवडणुका लढवल्या. त्यामुळे या मतदारसंघातील गाव गाड्या पर्यंत शिवसेना रुजली आहे. अशातच तानाजी सावंत,शिवाजी सावंत आणि अनिल सावंत यांच्या माध्यमातून आरोग्याची वारी देखील नागरिकांपर्यंत पोहोचवली. याचा आगामी निवडणुकीत शिवसेनेने निवडणूक लढवली तर अनिल सावंत यांना फायदा होऊ शकतो.
अनिल सावंत यांच्या उमेदवारीची होत असणारी चर्चा या निमित्ताने सावंत यांच्या घरातील काका पुतण्यांचे नातही पुढे येत आहे. आजपर्यंत अनेक काका पुतणे यांचे राजकारण पाहिले गेले. यामध्ये आता सावंत बंधू यांच्या राजकारणा सोबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे अनिल सावंत यांचे राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येऊन विधानसभेला गवसणी घालणारे ठरू शकते.
माढा तालुक्यातील वाकाव येथील सावंत कुटुंब अकरा वर्षांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील माळरानावर भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड या
व्यवसायाच्या निमित्ताने लवंगी सारख्या दुष्काळ ग्रस्त भागांमध्ये साखर कारखान्याची सुरुवात केली व त्या भागामध्ये असणारा शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न सोडवला गेला व त्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हॉईस चेअरमन अनिल दादा सावंत हे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये हिरारीने सहभागी होऊन सर्वसामान्य लोकांना मदत करतात गणपती उत्सव देवी महोत्सव असे वेगवेगळे उत्सव किंवा आरोग्य शिबिर ,रक्तदान शिबिर ,कुस्त्याचे स्पर्धा भरवतच असतात भागातील रोडच्या वाहतुकीच्या समस्या याबाबतीत वारंवार त्यांनी अधिकाऱ्यांच्या पाठपुरावा करून त्या भागांमध्ये तिथल्या लोकांची सोय करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत स आरोग्य मंत्री झाल्यापासून त्या भागातील बऱ्याच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अनिल दादा हे सक्रिय असतात आणि पंढरपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये त्यांचाही सतत संपर्क असतो.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पंढरपूर येथे आले असता त्यांच्याच घरी त्यांचे वास्तव्य असते आणि त्यांची नेहमी भेट होत असते पंढरपूर शहरांमध्ये पण त्यांचा भरपूर मोठा असा मित्र परिवार त्यांनी गोळा केला आहे. त्यांचा स्वभाव सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आहे त्यामुळे त्यांचा भविष्यामध्ये त्यांच्या ह्या स्वभावाचा या भागातील लोकांना नक्कीच फायदा होणार आहे तरी शिवसेनेने अश्या राजकारणातील नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी या भागातील नागरिक व शिवसैनिक करत आहेत.
Tags
राजकीय वार्ता