महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरीच्या वतीने पंढरपूरला वारकरी वर्गाला..हरीपाठ व छत्रीवाटप...
पंढरपुर प्रतिनिधी--
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समुहाचे वतीने वारकरी,पोलिस व पत्रकारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त अगस्ती ऋषी मठ,श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपादक डॉ.विश्वासराव
आरोटे,कार्यकारी संपादक नवनाथ जाधव,
नवी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे,अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले,उत्कृष्टशेतकरी पुरस्कार विजेते शिवाजी नाईकवाडी,अगस्ती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ॲड. के डी धुमाळ, हभप राजेंद्र महाराज नवले,हभप मनोहर महाराज भोर,दिपक महाराज देशमुख,नितीन महाराज गोडसे,विवेक महाराज केदार, गणेश महाराज वाकचौरे,तुकाराम महाराज आरोटे आदींसह पोलीस,पत्रकार व वारकरी तसेच पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, पंढरपूर शहर अध्यक्ष विनोद पोतदार, पंढरपूर कार्याध्यक्ष नागेश आदापुरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष रामदास नागटिळक आदी सह मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता