(रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट जसेच्या तसे परत)
सांगोला प्रतिनिधी --
ही घटना आहे भडकेवाडी (खानापूर) येथील निरंकारी भक्त संजय शेंडगे हे भडकेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत आणि ते काही कामानिमित्त खानापूर येथे निघाले होते रस्त्यावरुन जात असताना रस्त्याच्या बाजुला एक पैशाने भरलेले पाकीट सापडले त्यामध्ये जवळपास ९ हजार इतकी रक्कम आणी आधार कार्ड,लायसन्स,ए टी एम कार्ड इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे होती त्यांनी पाकीट मधुन मिळालेल्या लायसन्स द्वारे सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचा मोबाईल नंबर मिळवला
इकडे पाकीट हरवलेला व्यक्ती हताश होऊन बसला होता त्याचे घरचेही चिंताग्रस्त झालेली होती कारण खेडेगावातील त्या व्यक्तीचे रोज कामाला गेल्याशिवाय घर परिवाराचे पोट भरत नव्हते हातावरचे पोट अशातच पाकिट हरल्याने त्यांचा परिवार दुःखी होऊन बसलेला होता या घटनेने त्याला परिवाराकडुनही बोलने खावे लागले एवढ्यातच संजय शेंडगे यांचा त्यांना फोन आला आणी सांगितले की काळजी करू नका आपले पाकीट मला सापडले आहे या या ठिकाणी येऊन घेऊन जावा त्यांचे मन आनंदाने भरून वाहु लागले परंतु मनामध्ये एक विचार आला आपले पाकीट सापडले हे खरे परंतु त्यामध्ये नऊ हजार रुपये असतील का परंतु तसेच धाडस करुन ती व्यक्ती संजय शेंडगे यांचे घरी गेली शेंडगे यांनी त्यांना घरामध्ये बोलाऊन त्यांचा चहापाण केला व सापडलेले पाकीट पैशासह जसेच्या तसे दिले त्यांनी ते उघडून पाहिले तर पैसे व कागदपत्रे जसेच्या तसे त्यामध्ये होते ते पाहून ती व्यक्ती एवढी भावनीक झाली आणी म्हणाली की दुसरे कोणी असते तर मला हे पाकीट मिळाले नसते जगामध्ये तुमच्यासारखे प्रामाणिक पणाणे राहणारे फारच कमी लोक आहेत वगैरे बोलुन त्यांचे आभार मानले त्यांनी आदर सत्कार भाव पाहून त्यांना बोलु लागला एवढा प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आपल्यामध्ये आणी आपल्या परिवारामध्ये कसा काय आला हे मला जाणायचे आहे त्याचे हे बोलने ऐकुन संजय शेंडगे म्हणाले की "ज्याची वस्तु त्याची समजा काम नसे तक्रारींचे"सारा संसार एक परिवार , या निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे शिकवणीमुळे आमच्या मध्ये हा प्रामाणिकपणा आला आहे व्यक्तीलाही याबद्ल खूप कोहतुल वाटले आणी आज समाजाला निरंकारी मंडळाच्या शिकवणीची गरज आहे सर्वांनी हे आचरणात आणले पाहिजे तरच मानव सर्वांशी प्रेमाणे एकोप्याने आणी बंधुभावनेने राहतील अशी अशा व्यक्त केली तसेच निरंकारी मंडळाचे आभार मानले
Tags
सामाजिक वार्ता