श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल;

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. 
पंढरपूर (ता.12) 
आषाढी यात्रा 2024 सुरू असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 दोन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 11 जुलै रोजी पारित केले आहेत. 
तथापि, दिनांक 12 जुलै रोजी रात्री 7 वाजता श्री रमेश उत्तमराव वाघिरे राहणार नांदेड तालुका गंगापूर, औरंगाबाद व श्री महेश वासुदेव घायतिडक राहणार उमरी पारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या व्यक्तींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन रांगेतून पदस्पर्शदर्शन रांगेत घुसखोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रणाद्वारे व सुरक्षारक्षकाने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच श्रीच्या मुखदर्शन रांगेत सायंकाळी 6 वाजता व त्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली आहे.

या तिन्ही व्यक्तींनी घुसखोरी करून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने संबंधित व्यक्तीवर पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. श्री वाघिरे व श्री घायतीडक या दोन्ही व्यक्तीस पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form