अहमदनगर येथे होणार पुरस्कार प्रदान
पंढरपूर(प्रतिनिधि)
पंढरपूर शहर आणी तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना युवा क्रांती न्युज मिडीया महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून देण्यात येणारा ' आदर्श समाजसेवक' 2024 पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ' आदर्श समाजसेवक ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंढरपूर शहरातील निराधार अनाथ तसेच समाजापासून दूर राहणार्या अनेक समाज बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंढरपूर येथील मेडीकल व्यवसायिक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले अनेक वर्षांपासून करत आहेत.त्यांच्या या अनोख्या समाजकार्याचा ठसा मनामनावर उमटला आहे.
या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लोकप्रिय खासदार श्री निलेश लंके,सिने अभिनेत्री रोशनी सोलकर,सिने अभिनेता सागर निकम उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम सोमवार 15 जुलै 2024 सकाळी 12 वाजता येथे मार्कडे संकुल,नेप्ती नाका अहमदनगर येथे पार पडणार आहेत.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंढरपूर स्तरातून कौतुक होत आहेत.
Tags
सामाजिक वार्ता