पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा निधी लवकरच मिळणार

धनगर समाजाच्या प्रश्नासाठी भाई नितीन काळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा 
बहुजन कल्याण विभागाचे सचिवाना पुढील कार्यवाहीच्या सूचना 
पंढरपूर प्रतिनिधी--
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजने अंतर्गत भटक्या जमाती क वर्ग धनगर समाज बांधवांसाठी घरकुल प्रस्तावास कार्योत्तर मंजुरी व निधी वितरण करण्याबाबत भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव भाई नितीन काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना पाठपुरावा करीत लेखी पत्र दिले आहे. यावर देताच तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश. मुख्यमंत्री  शिंदे यांनी स्वतः सही करून सचिव इतर मागास व बहुजन कल्याण यांना आदेश दिले आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब धनगर समाजाचा  हा निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नितीन काळे यांनी पावसाळी अधिवेशन चालू असताना सतत पाठपुरावा सुरू ठेवला. व दिनांक 7.3.2024 रोजी सोलापूर जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली होती. त्यात भटक्या जमाती क धनगर प्रवर्गातील 1786 प्राप्त लाभार्थ्यांची शिफारस करण्याबाबत समितीने निर्णय घेतला घेतला होता. 
    याबाबत वरिष्ठ स्तरावर याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. ही बाब नितीन काळे यांच्या लक्षात आले असता, त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री यांची भेट घेतली व निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांना देखील याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.त्यांनीही सकारात्मक भुमिका दाखवल्याने येणाऱ्या काही दिवसात निधीचा प्रश्न मार्गी लागेल असेच दिसत आहे याबाबत नितीन काळे यांचे समाज बांधवांच्या वतीने आभार मानले जात आहे नितीन काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा पाठपुरावा करून लवकरच निधी मिळेल सरकार सकारात्मक आहे त्यामुळे धनगर समाजातील बांधवांना लवकर राहण्यासाठी निवारा मिळेल असेच वाटत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form