श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते वितरण ...

पंढरपूर प्रतिनिधी--
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फतआषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा. त्याच प्रमाणे इतर दिंड्यानीही त्याचा आदर्श घेवून या "निर्मल वारी, हरीत वारी अभियान"मध्ये सहभाग घ्यावा. या जाणिवेतून,श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत "श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” सन 2018 पासून सुरू करण्यात आला आहे. 

  यामध्ये श्री संत तुकाराम महाराज वंशज देहुकर दिंडी यांना एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, दानेवाला निकम दिंडी यांना ७५ हजारांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तर श्री गुरू बाबासाहेब आजरेकर दिंडी यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या "आरोग्यदूत" पुस्तकाचे प्रकाशनही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार समितीचे ॲड. माधवी ताई निगडे, ह.भ. प. भास्कर जवंजाळ, वृक्षमित्र ह.भ. प. शिवाजीराव मोरे, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री दीपक केसरकर, मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, वारकरी बंधू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form