जि.प. प्राथ.केंद्रशाळा फुलचिंचोली व अंतर्गत आठ भाग शाळामध्ये शिक्षण सप्ताह उत्साहात....

पंढरपूर प्रतिनिधी---
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात दि.२२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह राबविला जात आहे. त्या अनुषंगाने जि.प. प्राथ.केंद्रशाळा फुलचिंचोली व अंतर्गत आठ भाग शाळामध्ये  शासनाच्या नियोजित वेळापत्रका प्रमाणे उपक्रम यशस्वरित्या राबविण्यात आला.
फुलचिंचोली शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक  बुधवंतराव  यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षकांच्या सहभागाने दि. २८ रोजी अध्ययन अध्यापन दिवसाने सुरू झालेला सप्ताहात मूलभूत साक्षरता दिवस,क्रीडा दिवस, सांस्कृतिक क्रीडा दिवस  साजरा करणेसाठी फुलचिंचोली केंद्राचे केंद्रप्रमुख  गेंगाणे  उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले,कौशल्य डिजिटल दिवस, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबवून समुदाय सहभागाने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

या शैक्षणिक सप्ताहात फुलचिंचोलीचे सरपंच नारायण महादेव जाधव ,उपसरपंच दादासो हणुमंत प्रक्षाळे,शा.व्य.स.
अध्यक्ष सिध्दूबापू प्रक्षाळे,उपाध्यक्ष अतुल वाघ,सदस्य तात्यासो गायकवाड,ग्रा.प.सदस्य उमाकांत पाटील,नामदेव काळे,चंद्रशेखर जाधव,पत्रकार सावता जाधव,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब काळे ,तसेच शहाजी नामदे,मंगेश पवार,बापू शिंदे ई ग्रामस्थांनी सहभाग घेऊन शेवटच्या दिवसी वनभोजनासाठी विद्यार्थ्यांना गावठाण येथे आमंत्रित करून सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन मलांमध्ये चैतन्य निर्माण केले.

 ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form