पंढरपुर प्रतिनिधी--
लायन्स क्लब पंढरपूरच्या गतवर्षीच्या अध्यक्षा ला. आरती बसवंती यांनी गतवर्षी अतिशय विधायक कामे करून क्लबच्या यशाची कमान उंचावली. काही अतिशय उपयुक्त असे प्रोजेक्ट काही अडचणी मुळे अपूर्ण राहिले आहेत ते पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर लोकांनी निधी दिला आहे. ते प्रोजेक्ट सध्याच्याच अध्यक्षानी पूर्ण करावेत असे बऱ्याच सदस्यांचेही मत होते म्हणून बहूमताने आरती बसवंती यांना अध्यक्षपदासाठी संमती दिली.
त्यामुळे पुन्हा एकदा लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षा म्हणून ला. आरती बसवंती यांचे नाव क्लब प्रशासक ला.विवेक परदेशी यांनी जाहीर केले.
ला.आरती बसवंती यांनी आपले गेल्यावर्षीचे सहकारी संचालक मंडळ कायम ठेवले आहे. सचिव-ला. ओंकार बसवंती, खजिनदार ला. शोभा गुप्ता प्रथम उपाध्यक्ष ला. सीमा गुप्ता यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे.
सदर वर्षी पंढरपूर शहरात तीन गरजेच्या ठिकाणी चिल्ड्रेन पार्क बनवणे व डायलीसिस मशीनची गरीब रुग्णां साठी माफक व आवश्यकतेनुसार मोफत सेवा देणे हा ला. बसवंती यांचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
क्लबमधील जास्तीत जास्त ज्येष्ठ सदस्यांनी या कामी लायन आरती यांना सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे.
ज्येष्ठ क्लब सदस्य ला. रा. पां. कटेकर,ला. भारत वाघुले, ला. कैलास करंडे, ला. निर्मला पाटील, ला. मुन्नागीर गोसावी, ला.राजेंद्र शिंदे,ला. राजेंद्र गुप्ता, ला. डॉ. अमित गुंडेवार, ला. डॉ. मनोज भायगुडे,या व इतर बहुसंख्य संचालकांनी ला. आरती यांना शुभेच्छा दिल्या. पंढरपूरातील मान्यवरानी सहकार्याचे अभिवचन व शुभेच्छा दिल्या.
Tags
सामाजिक वार्ता