'इंडीयन टॅलेंट अवार्ड २०२४' पुरुस्काराने केले सन्मानित
पंढरपूर प्रतिनिधी--
समाजसेवेने पछाडलेला एक युवक, प्रारंभी स्वेरी सारख्या शिक्षण क्षेत्रात अव्वल ठरलेल्या संस्थेतून फार्मसी चे शिक्षण पूर्ण करून उद्योग धंदा, आपले घर, आपला परिवार पहाण्याच्या वयात तो स्वस्त न बसता प्रामाणिक समाजसेवा करू लागतो. खरं तर कोरोना महामारी नंतर मुजम्मील कमलीवाले यांना ओळखणारा एक वर्ग तयार झाला. अडचण असलेल्या व्यक्तींना कमलीवाले हे मदतीचा हात देऊ लागले. वेळ प्रसंगी पदरमोड करू लागले. त्याचे हे समाजकार्य अल्पावधीत सर्वदूर पोहचले. समाजकार्य पाहून अनेक सामाजिक संघटना विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. होय, मुज्जमील कमलीवाले त्या युवकाचे नाव!
पुणे येथील महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार सभागृहात पार पडलेल्या भरगच्च कार्यक्रमात कोरोना काळात केलेली मदत व त्याच्या समाजकार्याची दखल तेथील टॅलेंट कट्टा संस्थेने घेतली. प्रमुख पाहुणे " ह्युमन राइट्स कौन्सलिंग ऑफ इंडिया नॅशनल वर्किंगचे प्रेसिडिंट डॉ.राजेंद्रसिंग वालिया व कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी
अनिल आयाचित यांच्या हस्ते कमलीवाले यांचा 'इंडियन टॅलेंटअवॉर्ड २०२४' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह, गौरव पदक देऊन कमलीवाले यांना सन्मानित केले. यावेळी टॅलेंटकट्टा ग्रुपचे अध्यक्ष डॉ.दिपक दादाराव जाधव, वर्ल्ड स्किल बुक ऑफ रेकॉर्ड व युवा उद्योजक अध्यक्ष व क्युबीटकन कंपनीचे अध्यक्ष नितिन धवने यांच्यासह सहकारी उपस्थित होते. मुज्जमील कमलीवाले यांना या पुरस्काराने एक ऊर्जा मिळाली असून आयुष्यात अशीच समाज सेवा सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना 'टॅलेंट ग्रुपचे अध्यक्ष डाॅ दिपक जाधव यांचा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी तुळसीचा हार, विठ्ठलाची आकर्षक मुर्ती आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला.
Tags
सामाजिक वार्ता