पंढरपूर प्रतिनिधी--
सध्या काळ बदललेला आहे वेळही बदललेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये इंग्रजी भाषेला फार महत्व दिले जात नव्हते मात्र आता एकविसाव्या शतकामध्ये इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. जशी आपली मराठी भाषा, हिंदी मातृभाषा महत्वाची आहे तितकीच इंग्रजी भाषा देखील येणे गरजेचे बनले आहे. माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर विविध ठिकाणी व्यवसाय करताना किंवा परदेशात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याना इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. माध्यमिक विभाग असो अथवा महाविद्यालयीन क्षेत्र असो या सर्वच ठिकाणी इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे असलेल्या अपुऱ्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळाबरोबर बदलणे गरजेचे असून इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे देखील गरजेचे बनले आहे.
सध्या गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे सोपे झाले आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणे हे अशक्य झाले आहे. प्रत्येकाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी भरणे देखील अशक्य आहे. ग्रामीण भागात शासनमान्य इंग्रजी माध्यमांच्या शाळा फारच कमी आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तर काहींना अपुऱ्या सुविधांमुळे इंग्रजी भाषेच्या शाळेमध्ये प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळत नाही. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करणे गरजेचे बनले आहे.
वास्तविक पाहता इंग्रजी ही एक भाषाच आहे ती फार काही अवघड नाही ज्या पद्धतीने आपण आपली मायबोली मराठी भाषा, हिंदी भाषा बोलतो त्याच पद्धतीने इंग्रजी भाषा देखील बोलली जाते. मात्र याकरिता इंग्रजीचे ग्रामर परिपक्व असणे आणि विद्यार्थ्याकडे इंग्रजी भाषेचे शब्दसंग्रह असणे गरजेचे आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी शब्दसंग्रह वाढवणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना इंग्रजी व्याकरणाचा सराव करणे आणि इंग्रजी भाषेतून बोलणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
माध्यमिक विभागातून उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा आणि इंग्रजी व्याकरणाच्या समस्या भेडसावत असतात ऐनवेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्याची वेळ येते. अशावेळी खाजगी कोचिंग क्लासेस त्यांना जॉईन करावे लागतात. कोचिंग क्लासेस मधून फक्त मार्गदर्शन मिळते. शब्दसंग्रह हा प्राथमिक शिक्षणपासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंतच मिळत असतो त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा शब्दसाठा वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजीमध्ये व्याकरणाचे वेगवेगळे भाग आहे. नाम, सर्वनाम, काळ ,व्यंजन, क्रियापद, आदी व्याकरणाचे भाग आहेत. या सर्व भागाचा अभ्यास करून योग्य प्रकारे वाक्यरचना करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे
खरं म्हटलं तर विद्यार्थी हा प्राथमिक शिक्षणातच घडत असतो प्राथमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते म्हणूनच प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होत असतो. त्यामुळे पहिली ते आठवी हे आठ वर्ष खूप महत्त्वाचे आहेत. या आठ वर्षातच विद्यार्थ्याची शैक्षणिक जडणघडण होत असते. विद्यार्थी परिपक्व होत असतो. आणि त्याला ज्ञानही आत्मसात होत असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपले भाषा कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याबरोबर पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपला पाल्य ज्या विषयात कच्चा आहे त्या विषयाचा सराव करून घेणे , आपला पाल्य कुठे कमी पडतो याचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे हे ही पालकांची जबाबदारी आहे.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडून अभ्यास करून घेणे गरजेचे आहे. शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी वेळेबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे हे गरजेचे बनले असून भविष्यात इंग्रजी भाषा ही गरजेची बनणार असून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गाफील न राहता वेळेबरोबरच ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा येण्यासाठी काय करावे..?
1. विद्यार्थ्यांनी दररोज इंग्रजी भाषेची पाच शब्द संग्रह पाठ करावे (vocabulary)
2) विद्यार्थ्यांनी दररोज दहा इंग्रजी क्रियापदे लिहावे ( 10 verbs)
3) विद्यार्थ्यांनी छोटी छोटी वाक्य मराठीत लिहून त्याचे इंग्रजी भाषेत अनुवादन करण्याचा प्रयत्न करावा. (Translate the sentence)
4) विद्यार्थ्यांनी दोन किंवा चार विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून इंग्रजी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा (communication skill )
5) विद्यार्थ्यांनी दररोज आपल्याकडून केल्या जाणाऱ्या कृतीचा इंग्रजी भाषेतून लेखन करावे डेली रुटीन इंग्रजी भाषेतून लिहिण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करावा (Daily routine)
6) ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये मराठी भाषा बोलतो त्याच पद्धतीने इंग्रजी भाषा सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून दोन्ही भाषा अवगत होतील आणि संभाषण कौशल्य देखील विकसित होईल
7) विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करण्याकरिता व्याकरणाचे महत्त्वाचे भाग असणारे तीन प्रमुख काळ अर्थात वर्तमान काळ, भूतकाळ, आणि भविष्यकाळ हे वाचून काढणे व काळाप्रमाणे वाक्यरचना करावीत.
8) विद्यार्थ्यांनी वर्तमान काळाचे एखादी वाक्य लिहून त्या वाक्याचे रूपांतर भूतकाळात करण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळातील एखादे वाक्य लिहून त्या वाक्याचे रूपांतर भविष्यकाळात करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तिन्ही काळ परफेक्ट होतील आणि भाषेचे ज्ञान अवगत होईल
अशाप्रकारे विविध ट्रिक्स वापरून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाबाबत आणि काळाबाबत पुढील लेखांमध्ये आपण लिहिणारच आहोत. विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याकरिता आपण काळाचे प्रकारही पुढील लेखांमध्ये शिकवणार आहोत तोपर्यंत वरील दिलेल्या युक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढवणे आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे हे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा वापर करावा आणि आपले ज्ञान कौशल्य वाढवावे याकरिताच हा आजचा संपादकीय लेख.
तूर्तास एवढेच थांबूया इथेच धन्यवाद...
लेखक :- अश्फाक देवळे तांबोळी सर 8788825410 B.A. (English) M.A. (English.) (D.T.Ed. English ).
लेखक हे स्वतः शिक्षक असून गेल्या दहा वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत
Tags
शैक्षणिक वार्ता