सांगोला प्रतिनिधी--
लहान मुले ही देवाघरची फुले असून, त्यांना तुम्ही कसा आकार देता किंवा घडविता त्याप्रमाणे ते घडतात. व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत चे विद्यार्थी आपल्या गुरुजींचे म्हणजे शिक्षकाचे सर्व काय ऐकतात व त्यामुळे त्यांची गुणवत्ता वाढीस मदत होईल व यासाठी तुम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवा. असे मत सां. ता.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी प्राथमिक शिक्षक पदी निवड झालेले शिक्षक प्रणव राज रविराज शेटे यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. सुरुवातीस प्रणव शेटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. शीला काकी झपके, रविराज शेटे उपस्थित होते.
Tags
शैक्षणिक वार्ता