पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या तुंगत गावांतर्गत आंंध भांगे वस्ती रस्त्याच्या भीषण दुरावस्थेचा मुद्दा कळीचा बनला असताना येथील लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि त्यांचे पती डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी पुढाकार घेऊन या विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याशी पाठपुरावा केला व या रस्त्याचे स्वखर्चातून तयार करण्याची विनंती केली त्यानुसार आमदार बबनदादा शिंदे व डॉक्टर रणदिवे यांनी या रस्त्याच्या मुरमीकरणास सुरुवात केल्याने येथील शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांचे झालेल्या दुरावस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी तुंगत येथील डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेतली आणि मी स्वतः या रस्त्यासाठी स्वखर्चातून मुरमीकरण करण्यास तयार आहे आपणही यासाठी काही आपले योगदान दिल्यास या ठिकाणी असलेल्या भांगे वस्ती आंधवस्ती आणि फरतडे वस्तीवरील शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास कमी होणार आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत होती या संदर्भातील या भागातील रहिवाशांनी वेळोवेळी डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही यातून काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिले होते त्यानंतर नुकतेच त्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेतली त्यांनीही हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात मुरमीकरण करण्यास सकारात्मकता दर्शवल्याने या रस्त्याचे ताबडतोब कामकाज रणदिवे यांनी सुरू केले भविष्यकाळात या भागाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लवकरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर आंध, नवनाथ रणदिवे, आमदार बबनदादा शिंदे प्रतिनिधी नवनाथ रणदिवे (सर), माझी ग्रामपंचायत सदस्य वामन वनसाळे, चेअरमन अविराज रणदिवे, फैयाज मुलाणी रहिवाशी दादा भोसले, धनाजी रणदिवे, सुभाष भापकर, गणेश रणदिवे, पंपु बनसोडे, सचिन डिकरे, समाधान पवार, सोहम पवार, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता