पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

३१  मे आणि १ जून रोजी होणार कार्यक्रम -- अध्यक्षपदी संतोष बंडगर तर कार्याध्यक्षपदी राहुल गावडे

पंढरपूर- प्रतिनिधी 
पंढरपूर शहर आणि तालुका मध्यवर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती महोत्सव  सोहळ्या
निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पंढरीत येत्या 31 मे आणि 1 जून 2024 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संतोष बंडगर यांनी दिली.

 या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवार दि 31 मे 2024 रोजी सकाळी वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी पंढरपूर  उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुनसिंह भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत घोडके, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, आयपीएस अधिकारी डॉ.शुभमकुमार, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुबे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय लवटे, शाखा अभियंता उमेश शिंदे, एम एस ई बी चे सहाय्यक अभियंता तुषार होनमाने, अजय गावडे, पांडुरंगचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार समाजसेवक राजाभाऊ खरे, शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख, दामाजीचे व्हाईस चेअरमन तानाजीराव खरात, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

 या प्रतिमा पूजन कार्यक्रमानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत याच ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू ऑपरेशन , रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. दुपारी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे.  शनिवार दिनांक 1 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक पंढरपूर शहरातून निघणार आहे. या मिरवणूकीमध्ये पारंपारिक धनगरी गजी ढोल नृत्य, नृत्य ताफा, लेझीम, हलगी, घोडे, उंट, सनई हलगी ताफा यांचा समावेश असणार आहे. यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही पंढरपूर शहर व तालुका मध्यवर्ती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदाच्या या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष बंडगर उपाध्यक्ष संतोष येडगे, कार्याध्यक्ष राहुल गावडे ,स्वागताध्यक्ष अजय खांडेकर, पंकज देवकते ,खजिनदार प्रशांत घोडके, सह खजिनदार अण्णा सलगर ,प्रसाद कोळेकर, सचिव प्रवीण सलगर ,संजय लवटे सर, सहसचिव पांडुरंग सलगर, विनोद ठेंगील, आप्पासाहेब रुपनर, वैभव अलदर. मिरवणूक प्रमुख शालिवाहन कोळेकर ,सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे ,माऊली हळनवर ,संजय माने, गणेश गावडे ,अतुल येडगे, बिरुदेव कोकरे ,बालाजी पाटील, अनिकेत मेटकरी, सचिन हराळे ,शंकर मदने, खंडू लवटे, संतोष पाटील ,बबन येळे यांचा समावेश आहे. वरील
कार्यकर्त्यांसह शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form