कोपरा (अहमदपूर)--
भगवान नृसिंह जयंती निमित्त मौ.कोपरा या.अहमदरपूर जि लातूर येथे श्री नृसिंह भगवान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भगवान नृसिंह मंदिरात अभिषेक पूजा पठाण कीर्तन भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला
याप्रसंगी प्राध्यापक श्री गजानन सुवर्णकार महाराज दापकेकर यांनचे सुंदर असे किर्तना झाले. यावेळी परिसरातील संगीत विशारद श्री. नामदेव भदाडे, श्री, संभाजी माने, तसेच, श्री, बाबुराव रत्नपारखेे श्री.भ. भानुदास गोविंदवाड, श्री. सटवाजी बांडे, निवृत्ती पाचंगे, पंढरी देपे, इत्यादी मृदंग वादक श्री चोपडे, ओम पांचगे विष्णु चोपडे, यांनी किर्तनकारांना संगीतमय साथ दिली.
नृसिंह जयंती निमित्ताने श्री. हरिश्चंद्र सिताराम रत्नपारखे यांनी महाप्रसाद अन्नदान केले. गावातील भाविक व परिसरातील भाविक भक्तांनी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. आमचे मार्गदर्शक श्री ह.भ.प.उद्धव रंगनाथ रत्नपारखे महाराज यांनी दि. 19/02/2024 पासून दि. 21/05/2024 पर्यंत प्रत्येक रविवारी ज्ञानेवरी प्रवचन केले. याचाही भाविक भक्तांनी प्रवचनाचा लाभ घेतला. श्री. नृसिंह भगवान जयंती उत्सवास श्री. ह.भ.प उद्धव महाराज कोपरेकर, श्री. हरिश्चंद्र सिताराम रत्नपारखे, श्री. गंगाधर सुर्यकांत रत्नपारखे, श्री अनंत सुर्यकांत रत्नपारखे, श्री. गणेश जगन्नाथ रत्नपारखे, श्री. राम उद्धव रत्नपारखे टाकळगावकर,व ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळी यांनी श्री नृसिंह भगवान जयंती उत्सवहासाठी परिश्रम घेतले.
Tags
धार्मिक वार्ता