राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान बियाणाकरीता अर्ज दाखल करण्याचे आवाहन....


सोलापूर प्रतिनिधी --
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान बियाणा
करीता अर्ज करणेसाठी अन्नधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत अनुदानावर राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाखाली बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

या सुविधेतंर्गत लाभार्थीना सन २०२४ मधील खरीप हंगामात अन्न व पोषण सुरक्षा
अभियान कडधान्य अंतर्गत तुर, मुग व उडीद १० वर्षाच्या आतील बियाणेकरीता रु. ५०/ किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे, तुर, मुग व उडीद १० वर्षाच्या वरील बियाणेकरीता रु. २५/ किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे, तसेच तुर, मुग व उडीद सलग पिक प्रात्यक्षीके, अंतरपीक पध्दती व पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षीकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाथी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य अंतर्गत बाजरी १० वर्षाच्या आतील बियाणेकरीता रु. ३०/ किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. तसेच बाजरी सलग पिक प्रात्यक्षीकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाथी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत मका सलग पिक प्रात्यक्षीकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाथी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तरी शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलवर दि. 4.6.2024 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दत्तात्रय गावसाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form