खर्डी येथे नृसिंह जयंती भक्तीमय वातावरणात साजरी


खर्डी प्रतिनिधी --
विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नृसिंह अवतार.पंढरपूर तालुक्यतील खर्डी येथे या नृसिंहाची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील कुलकर्णी वाडा,
हिलाळपार,कुंभार वाडा येथील मूर्तीवर सकाळी पवमान अभिषेक करण्यात आला.
दुपारी भजन करून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फुले वाहण्यात आली.
जन्मांचा अभंग आणि "कडकडला स्तंभ गडगडले गगन "या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी बापू केसकर,रामदास नाना रोंगे
हणमंत केसकर समस्त खर्डीकर कुलकर्णी परिवार तर हिलाळ पार येथे धर्मा हिलाळ
समाधान हिलाल ,दत्ता हिलाळ प्रशांत हिलाळ,आबा हिलाळ कुंभारवाडा 
येथे सर्व आयोजन रामदास कुंभार,भाऊ कुंभार,सुनील कुंभार,खंडू कुंभार भिकाजी कुंभार,शामराव कुंभार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.जयंती दिवशी काही ठिकाणी उपवास पाळण्यात आला तर प्रथेनुसार काही ठिकाणी प्रासादिक भोजनाचे आयोजन करण्यात आले.तर कुलकर्णी वाडा येथे दुसरे दिवशी प्रसादाचे आयोजन असते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form