मोदी सरकारच्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनसामान्यांना व्हावी म्हणून बैठकीचे आयोजन-- आमदार समाधान आवताडे

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी आमदार आवताडे मतदार संघात सक्रिय 

पंढरपूर प्रतिनिधी -- 
सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार दौरा पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आवताडे यांनी या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब, त्याचप्रमाणे महिला यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी केलेल्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनसामान्यांना व्हावी म्हणून आमदार समाधान आवताडे   पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती ते देत आहेत. 

आमदार आवताडे यांनी भाजपा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या विजयासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली असून यामध्ये सामाजिक, राजकीय, युवा, महिला यांची मुठ बांधुन प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे.आमदार समाधान आवताडे यांच्या मतदार संघातील विविध जि.प.गट, पंचायत समिती गट, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांनीही प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेऊन जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

अशाच घोंगडी बैठकीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे. ते पुढील गावाप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव,शिरढोण, कौठाळी ,वाखरी या चार गावांमधून दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळच्या सहा वाजून 30 मिनिटापर्यंत या चारी गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन केलेले आहे. असे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी ही माहिती दिली.
 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form