माढा मतदार संघात खा. शरद पवार स्वतः मैदानात उतरणार...

पंढरपूर प्रतिनिधी --
माढा लोकसभा मतदार संघातील सुरू असलेले अनेक तिढे सुटत चालले आहेत. उमेदवार महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीची चर्चा संपली आहे. आता हा मतदार संघ भाजपकडून खेचून घेण्यासाठी खा. शरद पवार स्वतः मैदानात उतरणार असून माढा मतदार संघासाठी तब्बल सहा दिवस सभा घेण्याचे नियोजन झाले आहे.
    महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील उतरले आहेत. त्यांच्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्या अडचणी दूर करण्यात खा. शरद पवार यांनी आपली चाणक्यनीती वापरत उमेदवारीला भलतीच बळकटी आणून दिली आहे.
    खा. शरद पवार याच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे.बुधवार २४ एफ्रील रोजी सकाळी १०वाजता मोडनिंब येथील मार्केट कमेठी मैदान.शुक्रवार २६एफ्रिळ रोजी करमाळा मार्केट कमेठी येथे सकाळी १०वाजता. त्याच दिवशी दुपारी २वाजता सांगोला येथे सभा होणार आहे. शनिवार २७एफ्रिल रोजी सकाळी १०वाजता दहिवडी. मंगळवार ३० एफ्रिल रोजी सकाळी १०वाजता फलटण. गुरुवार २मे रोजी सकाळी १०वाजता अकलूज येथे भव्य जाहीर सभा होणार आहे.
    वरील सर्व सभा माढा लोकसभा मतदार संघातील प्रमुख ठिकाणी होणार आहेत. यावरून धैर्यशील मोहिते पाटील यांचेसाठी स्वतः खा.शरद पवार यांनी पाच दिवसात सहा सभा होणार आहेत.या  महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी अगदी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form